काल सकाळी आम्ही लेण्याद्री, शिवनेरी आणि ओझर येथे गेलो होतो. सकाळी साडेसहा वाजता घरातून निघालो. ईशान उठला होता आणि घरातून निघताना दूध पिऊन झाले होते.
उगवत्या सूर्याचे दर्शन झाले आणि सकाळी निघाल्याचा आनंद झाला. मी ईशान ला सूर्य दाखवला आणि नमस्कार करून ‘चांगली बुद्धी दे’ असं म्हणावयास सांगितले ... ईशान ला पण सूर्य खूप आवडला.
त्याने नमस्कार केला आणि म्हणाला ‘ मला चांगली बुद्धी दे, 18 year old बनव’ !!!
त्याला लवकरात लवकर 18 वर्षाचे होऊन कार / JCB / Crane इत्यादी चालायचे आहे !
त्यासाठी तो अगदी आतुरतेने वाट बघत आहे!