Wednesday, June 10, 2015

ईशान ची प्रार्थना

आज रात्री ईशान म्हणाला 'mamma मी देवाला प्रार्थना करू?" मी म्हटलं कर की.
देवाजवळ जाऊन त्याने गुरुर्ब्रम्हा श्लोक म्हटला आणि पुढे म्हणाला "देवा मला शक्ती दे, मला बुद्धी दे, मला लवकर मोठ कर, मला मोठ्याने ओरडू देऊ नकोस, मला वाईट शब्द बोलू देऊ नकोस, मला लवकर झोप नको येऊ दे!!!!"

एवढ्या वेळ मी कौतुकाने त्याची प्रार्थना ऐकत होते .. आणि शेवटची request ऐकून मला खूपच हसू आले... मी पण लगेच देवाला प्रार्थना केली "याला दररोज लवकर ९ वाजता झोपू दे" ! :) :)

No comments: