Monday, November 1, 2021

How to put babies to sleep

लहान बाळाला झोपवणे यासारखं दुसरं अवघड काही असु शकते असं मला कुणीतरी मी आई होण्याआधी सांगितले असते तर माझा कधीच विश्वास बसला नसता . पण २ मुलांना जन्म देऊन सांभाळ केल्यावर आता जर कुणी म्हणाले की बाळ खूपच रडते आणि अजिबात झोपत नाही तर माझ्या अनुभवाची मदत होईल म्हणून खालील सूचना १. बाळाचे पोट भरलेले असले तरच त्याला झोपवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता २. बाळाने दूध पिल्यावर ढेकर दिलेला असला पाहिजे - त्याला खांद्यावर उभं घेऊन मानेपासून पाठीपर्यंत हात २-५ वेळेस फिरवला तर लगेच काम होते . ढेकर नाही दिल्यास पोटात गॅस होऊन बाळ रडू शकते ३. बाळ जागे होऊन आता बराच वेळ झाला आहे - साहजिक आहे ना , जर १० मिनिटापूर्वीच बाळ उठले असेल आणि झोप छान झाली असेल तर त्याला आता लगेच झोपवू शकत नाही ४. बाळाला गरम किंवा मानवेल इतपत हवा लागली पाहिजे . काही बाळ डोक्यावर अजिबात टोपी घालू देत नाही तेंव्हा त्याचा खूप आग्रह न केलेला बारा ५. बाळाला हलकेच मालिश किंवा मसाज केला तर झोप यायला मदत होऊ शकते (दिवसातून एकदाच बरं का ) ६. आता जी व्यक्ती झोपवत आहे तिच्यासाठी - तुम्ही आधी दीर्घ श्वास घ्या, आणि तुम्हाला बाळ झोपलं कि जे करायचे आहे ते आधी विसरून जा :) आता दीर्घ श्वास घ्या आणि मनात म्हणा "मी बाळाला अलगद छान छान झोपवणार आहे , आणि आमचं पिल्लू सुखी झोप घेणार आहे ". पुढची पायरी म्हणजे बाळाला सांगा "चला आता झोपूया , म्हणजे तू छान मोठा होशील ". आता एखादं गाणं किंवा rhythm music हळुवार आवाजात लावून / म्हणून त्याला मांडीवर घ्या . आजकाल rolling pram पण मिळतात - त्यात music पण असते . बाळ अगदीच तान्हे असेल तर त्याला कॉटन च्या मऊशार दुपट्यात बांधले पाहिजे तर ते लगेच झोपते .

No comments: